
एका चॅटमुळे एखाद्याला भेटण्याचा प्रयत्न करणारी मुलगी आजच्या जमान्यात कुठे राहते, हे संजय सूरकरांनी सांगावेच. नवीन गोष्टी चित्रपटात समाविष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे, पण थोडं का असेना अभ्यासपुर्वक समावेश हवा होता... ब-याच ठिकाणी रानभूल चा रिव्ह्यू पॉज़िटिव आला आहे. पण तसे नाहीये?

महाराष्ट्र टाइम्सच्या म्हणण्याप्रमाणे… “अर्थात या सिनेमात काही धागे सुटले आहेत. आजीचं अचानक नागपूरहून येणं, हिरॉईनने (नेहमीचा फिल्मीपणा करत) एकटीने पुढे पुढे करणं किंवा तत्सम काही छोट्या छोट्या गोष्टी. पण तसं असलं तरी अनेक गोष्टींमधलं डिटेलिंगही यात पद्धहायला मिळतं आणि सिनेमा संपताना थरारपटाचा धागा वगळता तसा या सिनेमाशी फारसा संबंध नसणाऱ्या 'सायको'त अनुभवलेल्या थराराची राहून राहून आठवण येते.”
सुबोध भावे मस्तच, तेजस्विनी पंडित, सई रानडे छान... मोहन जोशी, विनय आपटे, राया भावे नेहमीप्रमाणे उत्तम...!!! चित्रपटाच्या तांत्रीक बाजू चांगल्या आहेत, संगीताचा सुरेख उपयोग, गाण्याचा अजिबात मोह नाही, आणि सर्वांचा सुरेख अभिनय ह्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू तर कमी पडलीय ती एक चांगली स्टोरी...!!! (नेहमीच मराठी चित्रपटांची ही बॉम्ब राहिली आहे...)
एखादा चित्रपट पैसे देऊन बघावा असे वाटावे असे निर्मात्यांना वाटत असेल तर त्यानी चांगल्या आधी स्क्रिप्टवर आणि मग चांगल्या स्टार कास्ट वर पैसे लावावेत...!!! नाहीतर प्रेक्षक मराठी सिनेमापासून इतका दूर जाईल की त्याला परत आणणे शक्य होणार नाही..