Friday, May 6, 2011

नव्या पिढीने बघावाच असा --- बालगंधर्वमराठी रंगभूमीचा इतिहास लिहिताना ज्यांच्या नावाने काही सोनेरी पाने खर्ची पडावीत, नाटयसंगीतावर ज्यांच्या नावाची मुद्रा उमटावी, रंगभूमीवरील एक कालांश ज्याच्या नावाने, गंधर्वयुग म्हणून ओळखला जावा, असे बालगंधर्व! ‘बालगंधर्व’ हे नाव उच्चारताच मराठी मन अभिमानाने, आदराने भरून जाते. त्यांना न पाहिलेल्या, न एएकलेल्या माणसांनाही ‘बालगंधर्व’ म्हणजे एक स्वर्गीय कल्पना, विस्मयानंद देणारी दैवी आकृती वाटावी, यातच त्यांचे सारे कर्तृत्व सामावले आहे.
मराठी रंगभूमी आणि नाट्यसंगीताच्या क्षेत्रात सुवर्णयुग निर्माण करणारे नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात बालगंधर्व यांचा जीवनपट उलगडून दाखवणा-या ‘बालगंधर्व’ या मराठी चित्रपटाचा प्रीमिअर काल शुक्रवारी झाला... अप्रतिम, सुरेख, अद्वितीय, मस्त, जबरदस्त. फॅंटाब्युलस!!! असेच उद्गार निघतात नटरंग फेम राजेंद्र जाधव दिग्दर्शित आणि नितीन चंद्रकांत देसाई निर्मित आणि सुबोध भावे अभिनीत बालगंधर्व बघितल्यावर... !!!


सामान्यपणे शास्त्रीय संगीताचा चाहता नसणारा युवा हा चित्रपट पाहिल्यावर त्यामधील पदे न गुणगुणला तर नवल...!!! "मराठी अभिमान" संगीतकार कौशल इनामदार यांनी त्या काळाला साजेस संगीत दिलंय...!!! नीता लुल्लाचा कपडेपट आणि उदय गायकवाड याची रंगभूषा ह्या या चित्रपटाच्या आणखी महत्वाच्या गोष्टी आहेत. कला दिग्दर्शन स्वता निर्माते नितीन चंद्रकांत देसाई असल्याने चित्रपट भव्य होण्यात त्याची मदत झालीय... तांत्रीकदृष्ट्या बालगंधर्व उत्तम आहे... महेश लिमये याचा कॅमरा आणि प्रशांत खेडकर यांचे एडिटिंग हे सुंदर तर अभिराम भडकमकर याने या चित्रपटाची सर्वात महत्वाची बाजू समर्थपणे पेललीय ती म्हणजे - कथा, पटकथा आणि संवादाची... चित्रपटाच्या कास्टिंगवर घेतलेली मेहनत दिसून येते...चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल काहीच शंका नाही --- सुहास जोशी, विभावरी देशपांडे, प्राची म्हात्रे, किशोर कदम, आनंद अभ्यंकर, अविनाश नारकर, सागर तळाशीकर, राहुल सोलापूरकर, क्षितिज झापरकर, राहुल देशपांडे, लोकेश गुप्ते, मनोज कोल्हटकर हे लक्षात राहतात...!!!या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त लक्षात राहतो तो सहजसुंदर अभिनयाने साक्षात बाल गंधर्व उभा करणारा सुबोध...!!! स्त्री रूपामध्ये बालगंधर्व कसे दिसत असतील याची कल्पनाच करवत नाही... माझ्या सारख्यांना ज्यांनी खरे बालगंधर्व कसे दिसतात हे चित्रांमधूनच माहिती आहेत त्यांच्यासाठी सुबोधला बालगंधर्व बघणे ही एक मेजवानी आहे....
हा चित्रपट बघायलाच हवा असा आहे... आणि तो पण थेटरात...!!!

1 comment:

  1. Ratnagiri Property is great place for meditation, eco living and cultural place, it's best tourism place must visit yearly.. i found many informative info from this post and blog

    ReplyDelete