Thursday, January 28, 2010

नटरंग - मराठीतल्या परफेकनिष्ट चा उत्कृष्ट चित्रपट

रवि जाधव दिगदर्शित आणि अतुल कुलकर्णी अभिनीत नटरंग ही प्रेक्षकाना एक प्रकारची पर्वणी आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अतुल ने साकारलेला 'गुणा' मराठीत इतर कोणाला हे शक्य झाले असते असे वाटत नाही...

आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात अतुलने सुमारे १५ किलो वजन वाढवून परत १७ किलोने कमी करने मराठीतल्या कुणी केलेलं ऐकिवात नाही... सर्वच बाजुनी हा चित्रपट चांगला आहेच, पण गुरु ठाकुरनी लिहलेल्या लावण्या, त्यांना संगीतबद्ध करताना अजय-अतुल या संगीतकारांनी कुठेही न केलेली कसूर आणि त्या चित्रबद्ध करताना घेतलेली काळजी यांमुळे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहवा असा झाला आहे....सोनाली आणि अमृता यांच्या लावण्या "दी बेस्ट" झाल्या आहेत... "अप्सरा आली", "खेल मांडला" आणि "वाजले की बारा" ही मराठी गाणी नॉन मराठी मानसं सुद्धा गाताना दिसतायत हे विशेष... छायांकनात महेश लिमये यांची कामगिरी उत्तमच आहे....
मराठी चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते....
आता वाट पाहतोय ती चित्रतपस्वीच्या घडन्याची .... "हरिश्चाद्राची फैक्ट्री" ची...

Tuesday, January 26, 2010

जोगावाच्या टीम चे हार्दिक अभिनन्दन !


जोगावाच्या टीम चे हार्दिक अभिनन्दन !

जोगावाच्या निमित्ताने मराठी चित्रपट अगदी राष्ट्रीय स्तरावर पोचला यासाठी राजीव पाटिल यांच्या टीम ला हार्दिक धन्यवाद. मराठी चित्रपटाच्या संगीताला नवीन आयाम देना-या संगीतकारद्वयी अजय - अतुल यांच्या संगीताला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हेही नसे थोडके... "तयाप्पा" जगाना-या हाडाच्या कलावंताला "उपेंद्रला" सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषक मिळाले याबद्दल महाराष्ट्राला आणि मराठी सिनेमाला त्याचा सार्थ अभिमान आहे...
"जोगवा" त मुक्ता बर्वेने सुद्धा अतिशय चांगले काम केले आहे यात शंकाच नाही... मराठीला ब-याच वर्षानंतर एक सशक्त अभिनेत्री मिळाली... मुक्ताला जरी अवार्ड मिळाला नसेल तरीही तिचे सर्वांग सुन्दर अभिनायासाठी मनापासून अभिनन्दन...
मराठी चित्रपट सृष्टि गेल्या काही महिन्यात अगदी बदललेली वाटते... मराठी चित्रपटात बरेचसे बदल झाले आहेत हे मान्य करावेच लागेल. आजपर्यतच्या मराठी सिनेमात जे नव्हतं किंबहुना ज्याकडे कमी लक्ष्य दिलं जायचं ते आली हे जोगवा, गैर, नटरंग यासारखे सिनेमे बघून पटतं...
तेलगू चित्रपटसृष्टिमध्ये हे तंत्र पाच ते सहा वर्षापासून सर्रास वापरले जातेय...
२०१० च्या राष्ट्रीय पुरस्कारात अतुल कुलकर्णीचे नाव नक्की असेल, यात काय शंका नाही... तांत्रिकदृष्टया सरस मराठी चित्रपटांच्या स्वागताला तैयार राहू या...

Friday, January 22, 2010

माझ्या ब्लॉग वर सर्वांचे स्वागत आहे.............

नमस्कार मित्रानो
माझ्या ब्लॉग वर सर्वांचे स्वागत आहे.............
माझे सिनेमा वेड सगळ्या मित्रांना माहिती आहेच. सिनेमे पाहणे हा एक आवडता छंद.... मराठीमधून लिहावं असं फार वाटत होतं म्हणून हा प्रपंच.........
मित्रानो एन्जॉय करा.
आपला सखा, मित्रा, फ्रेंड
राहुल जगन्नाथ महामुनी