Friday, May 6, 2011

नव्या पिढीने बघावाच असा --- बालगंधर्वमराठी रंगभूमीचा इतिहास लिहिताना ज्यांच्या नावाने काही सोनेरी पाने खर्ची पडावीत, नाटयसंगीतावर ज्यांच्या नावाची मुद्रा उमटावी, रंगभूमीवरील एक कालांश ज्याच्या नावाने, गंधर्वयुग म्हणून ओळखला जावा, असे बालगंधर्व! ‘बालगंधर्व’ हे नाव उच्चारताच मराठी मन अभिमानाने, आदराने भरून जाते. त्यांना न पाहिलेल्या, न एएकलेल्या माणसांनाही ‘बालगंधर्व’ म्हणजे एक स्वर्गीय कल्पना, विस्मयानंद देणारी दैवी आकृती वाटावी, यातच त्यांचे सारे कर्तृत्व सामावले आहे.
मराठी रंगभूमी आणि नाट्यसंगीताच्या क्षेत्रात सुवर्णयुग निर्माण करणारे नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात बालगंधर्व यांचा जीवनपट उलगडून दाखवणा-या ‘बालगंधर्व’ या मराठी चित्रपटाचा प्रीमिअर काल शुक्रवारी झाला... अप्रतिम, सुरेख, अद्वितीय, मस्त, जबरदस्त. फॅंटाब्युलस!!! असेच उद्गार निघतात नटरंग फेम राजेंद्र जाधव दिग्दर्शित आणि नितीन चंद्रकांत देसाई निर्मित आणि सुबोध भावे अभिनीत बालगंधर्व बघितल्यावर... !!!


सामान्यपणे शास्त्रीय संगीताचा चाहता नसणारा युवा हा चित्रपट पाहिल्यावर त्यामधील पदे न गुणगुणला तर नवल...!!! "मराठी अभिमान" संगीतकार कौशल इनामदार यांनी त्या काळाला साजेस संगीत दिलंय...!!! नीता लुल्लाचा कपडेपट आणि उदय गायकवाड याची रंगभूषा ह्या या चित्रपटाच्या आणखी महत्वाच्या गोष्टी आहेत. कला दिग्दर्शन स्वता निर्माते नितीन चंद्रकांत देसाई असल्याने चित्रपट भव्य होण्यात त्याची मदत झालीय... तांत्रीकदृष्ट्या बालगंधर्व उत्तम आहे... महेश लिमये याचा कॅमरा आणि प्रशांत खेडकर यांचे एडिटिंग हे सुंदर तर अभिराम भडकमकर याने या चित्रपटाची सर्वात महत्वाची बाजू समर्थपणे पेललीय ती म्हणजे - कथा, पटकथा आणि संवादाची... चित्रपटाच्या कास्टिंगवर घेतलेली मेहनत दिसून येते...चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल काहीच शंका नाही --- सुहास जोशी, विभावरी देशपांडे, प्राची म्हात्रे, किशोर कदम, आनंद अभ्यंकर, अविनाश नारकर, सागर तळाशीकर, राहुल सोलापूरकर, क्षितिज झापरकर, राहुल देशपांडे, लोकेश गुप्ते, मनोज कोल्हटकर हे लक्षात राहतात...!!!या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त लक्षात राहतो तो सहजसुंदर अभिनयाने साक्षात बाल गंधर्व उभा करणारा सुबोध...!!! स्त्री रूपामध्ये बालगंधर्व कसे दिसत असतील याची कल्पनाच करवत नाही... माझ्या सारख्यांना ज्यांनी खरे बालगंधर्व कसे दिसतात हे चित्रांमधूनच माहिती आहेत त्यांच्यासाठी सुबोधला बालगंधर्व बघणे ही एक मेजवानी आहे....
हा चित्रपट बघायलाच हवा असा आहे... आणि तो पण थेटरात...!!!

आलोय परत....

मित्रांनो... नमस्कार...!!!
खूप दिवस काही गोष्टींमुळे मी काही लिहु शकलो नाही... एका अपघाताने माझे बरेच दिवस खर्च झाले.. पण आता मी परतलोय आणि ते पण एक सुंदर सिनेमा घेऊन... मधल्या काळासाठी माफी...!!!
राहुल

Saturday, June 12, 2010

भरकटलेला प्रवास "मुंबई पुणे मुंबई...!!!"बहुदा पहिलीच मराठी लव्ह स्टोरी अशी वाटणारी सतीश राजवाडे दिग्दर्शित मराठी सिनेमा म्हणून मुग्धा बर्वे आणि स्वप्निल जोशी या फक्त दोघांचाच "मुंबई पुणे मुंबई" हा मराठी सिनेमा दि. ११ जून २०१० ला महाराष्ट्रात प्रदर्शित झाला... हा चित्रपट पाहावा असं फार मनात होतं आणि त्या उत्सुकते पोटी मी थेटरात गेलो. सिनेमाची कथा एक वन लाइनर आहे असंच म्हणावं लागेल, एका दिवसात होणारं प्रेम...!!!, पुणे मुंबई पुणे हे फक्त टायटल असून चित्रपट म्हणजे उभ्या महाराष्ट्राला माहिती असणा-या मराठी पाट्या आणि पुण्यात आल्यावर काय बघावं याबद्दलचा एक माहितीपट वाटावा, असा भासतो.

मराठी मध्ये अनेक प्रयोगशील माणसं आहेत यात वाद नाही, "मुंबई पुणे मुंबई" हा देखील सतीश राजवाडे टीमचा एक प्रयोग इतकच ते काय त्याचं महत्व...!!! चित्रपटात असा एक सीन नाही जो लक्षात राहतो, स्वप्निल आणि मुक्ता मराठीतले चांगले अक्टर्स आहेत यात काहीही वाद नाही पण उगाचच आठवून आठवून डायलॉग्ज बोलले जातायत असं वाटतं... त्यांची केमिस्ट्री जुळवण्यापेक्षा पुणे आणि मुंबईच्या माणसांचे पटते की नाही हे गळी पाडण्याचा प्रयत्न सिनेमाभर प्रेक्षकांना अनुभवायास मिळतो आणि तो ही पैसे खर्च करून...

मनाला वाटते की एका दिवसात एवढा फिरता येते आणि आले तरी एखाद्या अनोळखी मुलीच्या मनात असं काही तरी वागुन जसं स्वप्निल सगळा सिनेमा भर वागतो, जागा बनवता येते, ते पण मुंबईच्या फास्ट फॉरवर्ड लाइफ मधल्या मुलीच्या मनात? मध्येच आर्नव आणि सुन्चि या पात्रांची उगाचच आठवण करून दिली जाते. वाटतं की यार हे चाललाय तरी काय? म्हणायला एक गाणे आहे पण त्यात गाणे भरून शाहरूख साहेबांच्या "केव्हा आनंद केंव्हा दु:ख" अर्थात K3G मधील "सूरज हुआ मध्यम" या गाण्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही!!!

बाकीच्या गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा किंवा करायचा म्हणून प्रयोग करायचा यापेक्षा , सिनेमाच्या कथेवर जास्त काम झाले तर आणि तरच मराठी सिनेमाला पैश्यांची सुगी करता येईल, नाहीतरी असे फसलेले प्रयोग बघावे आणि नेमक्या शब्दात सांगायचे झाले तर झेलावे लागणार नाहीत.. चाकोरी बाहेर काही तरी करताना प्रमाणिकतेचा आभाव नको प्लीज!!!

"मुंबई पुणे मुंबई... हा एक भरकटलेला प्रवास आहे असंच म्हणावं लागेल?!!!"

Tuesday, May 18, 2010

वाट चुकलेला ‘रानभूल’

संजय सूरकर दिग्दर्शित आणि सुबोध भावे अभिनीत रानभूल दि. १४ मे ला प्रदर्शित झाला... प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीमुळे अगदी उत्कंठा लागून राहिलेला रानभूल बघायला गेलो आणि हे काय चाललय? असे प्रश्न निर्माण होऊ लागले... एक मुलगा असतो, लहानपणी त्याचे बाबा त्याच्यावर थोडा राग राग करतात, त्याला अंधा-या खोलीत कोंडून काय ठेवतात, त्याची आजी त्याची समजूत काय काढते, त्याला सांगते की, तू देवाचा माणूस आहेस, त्याला म्युझिकचा छन्द काय असतो, त्याला त्याची ट्यून म्हणजे देवाचे म्युझिक काय वाटते, ते आवडले किंवा नाही यावर माणसाचा विचार, त्यासाठी स्वत:च्या प्रेयसीला, प्रसंगी ते समजल्यामुळे तिच्या बाबांना काय मारतो, अरे चाललय काय असे वाटळ्याशिवाय राहत नाही?एका चॅटमुळे एखाद्याला भेटण्याचा प्रयत्न करणारी मुलगी आजच्या जमान्यात कुठे राहते, हे संजय सूरकरांनी सांगावेच. नवीन गोष्टी चित्रपटात समाविष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे, पण थोडं का असेना अभ्यासपुर्वक समावेश हवा होता... ब-याच ठिकाणी रानभूल चा रिव्ह्यू पॉज़िटिव आला आहे. पण तसे नाहीये?महाराष्ट्र टाइम्सच्या म्हणण्याप्रमाणे… “अर्थात या सिनेमात काही धागे सुटले आहेत. आजीचं अचानक नागपूरहून येणं, हिरॉईनने (नेहमीचा फिल्मीपणा करत) एकटीने पुढे पुढे करणं किंवा तत्सम काही छोट्या छोट्या गोष्टी. पण तसं असलं तरी अनेक गोष्टींमधलं डिटेलिंगही यात पद्धहायला मिळतं आणि सिनेमा संपताना थरारपटाचा धागा वगळता तसा या सिनेमाशी फारसा संबंध नसणाऱ्या 'सायको'त अनुभवलेल्या थराराची राहून राहून आठवण येते.”
सुबोध भावे मस्तच, तेजस्विनी पंडित, सई रानडे छान... मोहन जोशी, विनय आपटे, राया भावे नेहमीप्रमाणे उत्तम...!!! चित्रपटाच्या तांत्रीक बाजू चांगल्या आहेत, संगीताचा सुरेख उपयोग, गाण्याचा अजिबात मोह नाही, आणि सर्वांचा सुरेख अभिनय ह्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू तर कमी पडलीय ती एक चांगली स्टोरी...!!! (नेहमीच मराठी चित्रपटांची ही बॉम्ब राहिली आहे...)
एखादा चित्रपट पैसे देऊन बघावा असे वाटावे असे निर्मात्यांना वाटत असेल तर त्यानी चांगल्या आधी स्क्रिप्टवर आणि मग चांगल्या स्टार कास्ट वर पैसे लावावेत...!!! नाहीतर प्रेक्षक मराठी सिनेमापासून इतका दूर जाईल की त्याला परत आणणे शक्य होणार नाही..

Thursday, April 15, 2010

‘लालबाग परळ' - वास्तव भाग २

मुंबईमध्ये असणाऱ्या कापड गिरण्या, रात्रंदिवस त्यांची होणारी धडधड, आणि त्यावर अवलंबून लाखो कामगार कुटुंबं. यातल्याच एका कुटुंबाभोवती या सिनेमाची कथा भिरभिरते….
संपानंतर झालेली त्या अख्ख्या कुटुंबाची वाताहत, दिवसाची रात्रीशी गाठ घालताना होत गेलेली ओढाताण आणि त्यातनं लयास गेलेलं कुटुंब... अशी ही सिनेमाची एकूण कथा.अभिनयाच्या पातळीवर झक्कास. शशांक शिंदेंनी उभा केलेला हतबल गिरणी कामगार असो की त्याची बायको झालेली सीमा विश्वास. गिरणी कामगारांचं घर या दोघांच्या खांद्यावर अगदी खणखणीत उभं राहिलंय. त्या दोघांना अप्रतिम साथ मिळालीय, ती अंकुश चौधरी, करण पटेल आणि विनीत सिंगच्या अभिनयाची. तीन भावांच्या तीन तऱ्हा, त्रागा आणि तरीही कुठेतरी कुटुंबाशी असलेले भावबंध तिघांनीही छान उभे केले आहेत. संतोष जुवेकर आणि भरत जाधवचे डबिंग सुरेख बसते...!!! संतोषचा आवाज तर अगदी चपखल बसतो..!!!

वीणा जामकर आणि सिद्धार्थ जाधव आपापल्या जागी बेस्ट !!! चित्रपटामध्ये वीनाचे उन्मळून पडणं, भीती आणि क्षणात निर्माण झालेली चीड दाखवताना तिने ज्या भावमुदा दाखवल्या आहेत त्याला तोड नाही. सिद्धार्थ जाधवने तोतऱ्या पंटर छान जमवलाय!!!
कामगार नेत्याच्या भूमिकेतील सचिन खेडेकरची भूमिका अतिशय मिळमिळित वाटते… विनय आपटे मात्र क्लास, अगदी उत्कृष्ट…!!! वैभव मांगलेनी दत्ता सामंतांना उभं करायचा अयशस्वी प्रयत्न केलाय. सतीश कौशिक आणि कश्मिरा शहा उगाचच !!! कश्मिरा शहा तर फक्त हॉट आहे म्हणून आहे असे वाटते ...!!! तिच्या जागी कुणीही चालली असती….!!! अगदी कुणीही...!
थोडे अपवाद वगळता, चांगला...!!! थेटरात बघायला सर्वोत्तम.... यात वाद नाहीच...!!! पण शेवट बदलता आला असता... थोडासा का असेना रंजक करता आला असता... एकदम इमोशनल झालाय उगाचच!!!

Monday, March 22, 2010

डुंबयला आवडेल अशी उमेशची 'विहीर'

अरभाट कृत आणि ए. बी. कोर्प निर्मित उमेश विनायक कुलकर्णी यांची "विहीर" बघायला वेळ झाला...
पैसे नव्हते आणि वेळही, अर्थात मार्च एण्डमुळे...!!!
अतिशय संवेदनशील विषयावर बेतलेला विहीर हा एक मराठीतल्या चांगल्या चित्रपटातला एक आहे यात काहीही वाद नाही. महत्वाचे म्हणजे मुळात अभिनेता म्हणून आतापर्यंत माहिती असलेला गिरीश दादा चांगला लेखक, पटकथाकार आहे हे समजले... पण अमिताभ बच्चन ने मराठीमध्ये पैसे गुंतवावे म्हणून गाजावाजा झालेला "विहीर" हा चांगल्या स्क्रिप्टमुळे पैसे कोणाचे का लागेनात पैसे वसूल होणार होते हे नक्की.. सुधीर पलसाने याचे उत्तम चयचित्रण असलेला आणि नीरज वोरलिया यांचे एडिटिंग , मंगेश धाकडे याचे उत्तम पार्श्वसंगीत, मदन देवधर (समीर) आणि अलोक राजवाडे (नच्यादादा) सुरेख अदाकारी,
फिजिक्सच्या भन्नाट कल्पना आणि नच्यादादाचे लॉजिक, सम्याचे त्याच्याशी असणारे भावनिक नाते यात डुंबलेला "विहीर"हिंदीच्या वणव्यामुळे या उन्हाळ्यात मनोरंजणात पोहायला "विहीर" मित्रांनो बघाच पण थेटरात...

Wednesday, March 3, 2010

हरिश्चाद्राची फैक्ट्री - शोध चित्रतपस्वीचा....

टलेन्टेड दिग्दर्शक परेश मोकाशी याच्या भन्नाट डोक्यातून आलेला भन्नाट कल्पना आणि ती वास्तवात आणण्यासाठी केलेला पुण्यातील राहत्या घराचा त्याग यावर उभा राहिलेला मराठी चित्रपट "हरिश्चाद्राची फैक्ट्री" मागच्या महीन्यात थेटरात आला... पण आर्थिक चणचण आणि मुख्य म्हणजे एकच शो व तोही हाउसफुल त्यामुळे "हरिश्चाद्राची फैक्ट्री बघण्यात फार विलंब झाला.... मी या चित्रपटाबद्दल काही लिहाण्यागोदर ब-याच जणांचे रीविव्ह आलेले आहेतच...चित्रपट नितांत सुंदर आहेच यात वाद नाही पण सुंदर वाटला तो नंदू दादाच्या फाळके मूळे... विभावारीच्या सौ फाळकेमूळे ... मोहित गोखलेचा "बाबारे" आणि अथर्व कर्वेच्या लहानग्या भावाने...
चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंचा परेशने फार चौकसपणे विचार केलेला आहेच... अमालेंदू चौधरीचे नितांत सुंदर छायांकन, आनंद मोडकांचे मोहक व परीस्थीती जन्य पार्श्वसंगीत हा चित्रपट सुंदर करण्यात मोलाचा वाटा उचलतात यात काही वाद नाही....

ऑस्कर वारीत धडकून आलेला आणि अतिशय चांगली हाताळणी असलेला हा चित्रपट सर्वांनी जरूर पहावा यात काही वाद नाहीच... पाहायचा पण थेटरात...