Saturday, June 12, 2010
भरकटलेला प्रवास "मुंबई पुणे मुंबई...!!!"
बहुदा पहिलीच मराठी लव्ह स्टोरी अशी वाटणारी सतीश राजवाडे दिग्दर्शित मराठी सिनेमा म्हणून मुग्धा बर्वे आणि स्वप्निल जोशी या फक्त दोघांचाच "मुंबई पुणे मुंबई" हा मराठी सिनेमा दि. ११ जून २०१० ला महाराष्ट्रात प्रदर्शित झाला... हा चित्रपट पाहावा असं फार मनात होतं आणि त्या उत्सुकते पोटी मी थेटरात गेलो. सिनेमाची कथा एक वन लाइनर आहे असंच म्हणावं लागेल, एका दिवसात होणारं प्रेम...!!!, पुणे मुंबई पुणे हे फक्त टायटल असून चित्रपट म्हणजे उभ्या महाराष्ट्राला माहिती असणा-या मराठी पाट्या आणि पुण्यात आल्यावर काय बघावं याबद्दलचा एक माहितीपट वाटावा, असा भासतो.
मराठी मध्ये अनेक प्रयोगशील माणसं आहेत यात वाद नाही, "मुंबई पुणे मुंबई" हा देखील सतीश राजवाडे टीमचा एक प्रयोग इतकच ते काय त्याचं महत्व...!!! चित्रपटात असा एक सीन नाही जो लक्षात राहतो, स्वप्निल आणि मुक्ता मराठीतले चांगले अक्टर्स आहेत यात काहीही वाद नाही पण उगाचच आठवून आठवून डायलॉग्ज बोलले जातायत असं वाटतं... त्यांची केमिस्ट्री जुळवण्यापेक्षा पुणे आणि मुंबईच्या माणसांचे पटते की नाही हे गळी पाडण्याचा प्रयत्न सिनेमाभर प्रेक्षकांना अनुभवायास मिळतो आणि तो ही पैसे खर्च करून...
मनाला वाटते की एका दिवसात एवढा फिरता येते आणि आले तरी एखाद्या अनोळखी मुलीच्या मनात असं काही तरी वागुन जसं स्वप्निल सगळा सिनेमा भर वागतो, जागा बनवता येते, ते पण मुंबईच्या फास्ट फॉरवर्ड लाइफ मधल्या मुलीच्या मनात? मध्येच आर्नव आणि सुन्चि या पात्रांची उगाचच आठवण करून दिली जाते. वाटतं की यार हे चाललाय तरी काय? म्हणायला एक गाणे आहे पण त्यात गाणे भरून शाहरूख साहेबांच्या "केव्हा आनंद केंव्हा दु:ख" अर्थात K3G मधील "सूरज हुआ मध्यम" या गाण्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही!!!
बाकीच्या गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा किंवा करायचा म्हणून प्रयोग करायचा यापेक्षा , सिनेमाच्या कथेवर जास्त काम झाले तर आणि तरच मराठी सिनेमाला पैश्यांची सुगी करता येईल, नाहीतरी असे फसलेले प्रयोग बघावे आणि नेमक्या शब्दात सांगायचे झाले तर झेलावे लागणार नाहीत.. चाकोरी बाहेर काही तरी करताना प्रमाणिकतेचा आभाव नको प्लीज!!!
"मुंबई पुणे मुंबई... हा एक भरकटलेला प्रवास आहे असंच म्हणावं लागेल?!!!"
Subscribe to:
Posts (Atom)