मुंबईमध्ये असणाऱ्या कापड गिरण्या, रात्रंदिवस त्यांची होणारी धडधड, आणि त्यावर अवलंबून लाखो कामगार कुटुंबं. यातल्याच एका कुटुंबाभोवती या सिनेमाची कथा भिरभिरते….
संपानंतर झालेली त्या अख्ख्या कुटुंबाची वाताहत, दिवसाची रात्रीशी गाठ घालताना होत गेलेली ओढाताण आणि त्यातनं लयास गेलेलं कुटुंब... अशी ही सिनेमाची एकूण कथा.
अभिनयाच्या पातळीवर झक्कास. शशांक शिंदेंनी उभा केलेला हतबल गिरणी कामगार असो की त्याची बायको झालेली सीमा विश्वास. गिरणी कामगारांचं घर या दोघांच्या खांद्यावर अगदी खणखणीत उभं राहिलंय. त्या दोघांना अप्रतिम साथ मिळालीय, ती अंकुश चौधरी, करण पटेल आणि विनीत सिंगच्या अभिनयाची. तीन भावांच्या तीन तऱ्हा, त्रागा आणि तरीही कुठेतरी कुटुंबाशी असलेले भावबंध तिघांनीही छान उभे केले आहेत. संतोष जुवेकर आणि भरत जाधवचे डबिंग सुरेख बसते...!!! संतोषचा आवाज तर अगदी चपखल बसतो..!!!
वीणा जामकर आणि सिद्धार्थ जाधव आपापल्या जागी बेस्ट !!! चित्रपटामध्ये वीनाचे उन्मळून पडणं, भीती आणि क्षणात निर्माण झालेली चीड दाखवताना तिने ज्या भावमुदा दाखवल्या आहेत त्याला तोड नाही. सिद्धार्थ जाधवने तोतऱ्या पंटर छान जमवलाय!!!
कामगार नेत्याच्या भूमिकेतील सचिन खेडेकरची भूमिका अतिशय मिळमिळित वाटते… विनय आपटे मात्र क्लास, अगदी उत्कृष्ट…!!! वैभव मांगलेनी दत्ता सामंतांना उभं करायचा अयशस्वी प्रयत्न केलाय. सतीश कौशिक आणि कश्मिरा शहा उगाचच !!! कश्मिरा शहा तर फक्त हॉट आहे म्हणून आहे असे वाटते ...!!! तिच्या जागी कुणीही चालली असती….!!! अगदी कुणीही...!
थोडे अपवाद वगळता, चांगला...!!! थेटरात बघायला सर्वोत्तम.... यात वाद नाहीच...!!! पण शेवट बदलता आला असता... थोडासा का असेना रंजक करता आला असता... एकदम इमोशनल झालाय उगाचच!!!
Thursday, April 15, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment