Thursday, April 15, 2010

‘लालबाग परळ' - वास्तव भाग २

मुंबईमध्ये असणाऱ्या कापड गिरण्या, रात्रंदिवस त्यांची होणारी धडधड, आणि त्यावर अवलंबून लाखो कामगार कुटुंबं. यातल्याच एका कुटुंबाभोवती या सिनेमाची कथा भिरभिरते….
संपानंतर झालेली त्या अख्ख्या कुटुंबाची वाताहत, दिवसाची रात्रीशी गाठ घालताना होत गेलेली ओढाताण आणि त्यातनं लयास गेलेलं कुटुंब... अशी ही सिनेमाची एकूण कथा.



अभिनयाच्या पातळीवर झक्कास. शशांक शिंदेंनी उभा केलेला हतबल गिरणी कामगार असो की त्याची बायको झालेली सीमा विश्वास. गिरणी कामगारांचं घर या दोघांच्या खांद्यावर अगदी खणखणीत उभं राहिलंय. त्या दोघांना अप्रतिम साथ मिळालीय, ती अंकुश चौधरी, करण पटेल आणि विनीत सिंगच्या अभिनयाची. तीन भावांच्या तीन तऱ्हा, त्रागा आणि तरीही कुठेतरी कुटुंबाशी असलेले भावबंध तिघांनीही छान उभे केले आहेत. संतोष जुवेकर आणि भरत जाधवचे डबिंग सुरेख बसते...!!! संतोषचा आवाज तर अगदी चपखल बसतो..!!!

वीणा जामकर आणि सिद्धार्थ जाधव आपापल्या जागी बेस्ट !!! चित्रपटामध्ये वीनाचे उन्मळून पडणं, भीती आणि क्षणात निर्माण झालेली चीड दाखवताना तिने ज्या भावमुदा दाखवल्या आहेत त्याला तोड नाही. सिद्धार्थ जाधवने तोतऱ्या पंटर छान जमवलाय!!!
कामगार नेत्याच्या भूमिकेतील सचिन खेडेकरची भूमिका अतिशय मिळमिळित वाटते… विनय आपटे मात्र क्लास, अगदी उत्कृष्ट…!!! वैभव मांगलेनी दत्ता सामंतांना उभं करायचा अयशस्वी प्रयत्न केलाय. सतीश कौशिक आणि कश्मिरा शहा उगाचच !!! कश्मिरा शहा तर फक्त हॉट आहे म्हणून आहे असे वाटते ...!!! तिच्या जागी कुणीही चालली असती….!!! अगदी कुणीही...!
थोडे अपवाद वगळता, चांगला...!!! थेटरात बघायला सर्वोत्तम.... यात वाद नाहीच...!!! पण शेवट बदलता आला असता... थोडासा का असेना रंजक करता आला असता... एकदम इमोशनल झालाय उगाचच!!!

Monday, March 22, 2010

डुंबयला आवडेल अशी उमेशची 'विहीर'

अरभाट कृत आणि ए. बी. कोर्प निर्मित उमेश विनायक कुलकर्णी यांची "विहीर" बघायला वेळ झाला...
पैसे नव्हते आणि वेळही, अर्थात मार्च एण्डमुळे...!!!
अतिशय संवेदनशील विषयावर बेतलेला विहीर हा एक मराठीतल्या चांगल्या चित्रपटातला एक आहे यात काहीही वाद नाही. महत्वाचे म्हणजे मुळात अभिनेता म्हणून आतापर्यंत माहिती असलेला गिरीश दादा चांगला लेखक, पटकथाकार आहे हे समजले... पण अमिताभ बच्चन ने मराठीमध्ये पैसे गुंतवावे म्हणून गाजावाजा झालेला "विहीर" हा चांगल्या स्क्रिप्टमुळे पैसे कोणाचे का लागेनात पैसे वसूल होणार होते हे नक्की.. सुधीर पलसाने याचे उत्तम चयचित्रण असलेला आणि नीरज वोरलिया यांचे एडिटिंग , मंगेश धाकडे याचे उत्तम पार्श्वसंगीत, मदन देवधर (समीर) आणि अलोक राजवाडे (नच्यादादा) सुरेख अदाकारी,
फिजिक्सच्या भन्नाट कल्पना आणि नच्यादादाचे लॉजिक, सम्याचे त्याच्याशी असणारे भावनिक नाते यात डुंबलेला "विहीर"











हिंदीच्या वणव्यामुळे या उन्हाळ्यात मनोरंजणात पोहायला "विहीर" मित्रांनो बघाच पण थेटरात...

Wednesday, March 3, 2010

हरिश्चाद्राची फैक्ट्री - शोध चित्रतपस्वीचा....

टलेन्टेड दिग्दर्शक परेश मोकाशी याच्या भन्नाट डोक्यातून आलेला भन्नाट कल्पना आणि ती वास्तवात आणण्यासाठी केलेला पुण्यातील राहत्या घराचा त्याग यावर उभा राहिलेला मराठी चित्रपट "हरिश्चाद्राची फैक्ट्री" मागच्या महीन्यात थेटरात आला... पण आर्थिक चणचण आणि मुख्य म्हणजे एकच शो व तोही हाउसफुल त्यामुळे "हरिश्चाद्राची फैक्ट्री बघण्यात फार विलंब झाला.... मी या चित्रपटाबद्दल काही लिहाण्यागोदर ब-याच जणांचे रीविव्ह आलेले आहेतच...



चित्रपट नितांत सुंदर आहेच यात वाद नाही पण सुंदर वाटला तो नंदू दादाच्या फाळके मूळे... विभावारीच्या सौ फाळकेमूळे ... मोहित गोखलेचा "बाबारे" आणि अथर्व कर्वेच्या लहानग्या भावाने...




चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंचा परेशने फार चौकसपणे विचार केलेला आहेच... अमालेंदू चौधरीचे नितांत सुंदर छायांकन, आनंद मोडकांचे मोहक व परीस्थीती जन्य पार्श्वसंगीत हा चित्रपट सुंदर करण्यात मोलाचा वाटा उचलतात यात काही वाद नाही....





ऑस्कर वारीत धडकून आलेला आणि अतिशय चांगली हाताळणी असलेला हा चित्रपट सर्वांनी जरूर पहावा यात काही वाद नाहीच... पाहायचा पण थेटरात...

रिंगा रिंगा - फसलेला प्रयोग


निषाद औडिओ व्हिजुअल्स निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित रिंगा रिंगा हा मराठी चित्रपट एका आठवड्यात पाहिला....

Typical संजय जाधव movie असल्याने छायांकन चांगले असले तरी तेवढे बघायला जाणारा मराठी प्रेक्षक अजून तयार व्हायचा आहे... सोनाली कुलकर्णी भोवती गुंफलेला आणि अगदीच नगण्य भूमिकेतला भारत जाधव, व्यवस्थित रोल असलेला अंकुश व ज्याचा फायदा होईल असे दिसतेय असा संतोष ... मोठी starcast असलेला पण थोडा फसलेला.... Fade outs असलेला आणि ब्लक कान्वास असणारा संजय जाधव यांचा रिंगा रिंगा फेल जाईल आसे वाटते पण ओपनिंग चांगले मिळाल्यामुळे चालतोय इतकच...
मराठी फिल्म इंडस्ट्री चालण्यासाठी एकदा बघायला हरकत नाही....
बघाच पण थेटरात....

Thursday, January 28, 2010

नटरंग - मराठीतल्या परफेकनिष्ट चा उत्कृष्ट चित्रपट

रवि जाधव दिगदर्शित आणि अतुल कुलकर्णी अभिनीत नटरंग ही प्रेक्षकाना एक प्रकारची पर्वणी आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अतुल ने साकारलेला 'गुणा' मराठीत इतर कोणाला हे शक्य झाले असते असे वाटत नाही...

आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात अतुलने सुमारे १५ किलो वजन वाढवून परत १७ किलोने कमी करने मराठीतल्या कुणी केलेलं ऐकिवात नाही... सर्वच बाजुनी हा चित्रपट चांगला आहेच, पण गुरु ठाकुरनी लिहलेल्या लावण्या, त्यांना संगीतबद्ध करताना अजय-अतुल या संगीतकारांनी कुठेही न केलेली कसूर आणि त्या चित्रबद्ध करताना घेतलेली काळजी यांमुळे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहवा असा झाला आहे....



सोनाली आणि अमृता यांच्या लावण्या "दी बेस्ट" झाल्या आहेत... "अप्सरा आली", "खेल मांडला" आणि "वाजले की बारा" ही मराठी गाणी नॉन मराठी मानसं सुद्धा गाताना दिसतायत हे विशेष... छायांकनात महेश लिमये यांची कामगिरी उत्तमच आहे....
मराठी चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते....
आता वाट पाहतोय ती चित्रतपस्वीच्या घडन्याची .... "हरिश्चाद्राची फैक्ट्री" ची...

Tuesday, January 26, 2010

जोगावाच्या टीम चे हार्दिक अभिनन्दन !


जोगावाच्या टीम चे हार्दिक अभिनन्दन !

जोगावाच्या निमित्ताने मराठी चित्रपट अगदी राष्ट्रीय स्तरावर पोचला यासाठी राजीव पाटिल यांच्या टीम ला हार्दिक धन्यवाद. मराठी चित्रपटाच्या संगीताला नवीन आयाम देना-या संगीतकारद्वयी अजय - अतुल यांच्या संगीताला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हेही नसे थोडके... "तयाप्पा" जगाना-या हाडाच्या कलावंताला "उपेंद्रला" सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषक मिळाले याबद्दल महाराष्ट्राला आणि मराठी सिनेमाला त्याचा सार्थ अभिमान आहे...
"जोगवा" त मुक्ता बर्वेने सुद्धा अतिशय चांगले काम केले आहे यात शंकाच नाही... मराठीला ब-याच वर्षानंतर एक सशक्त अभिनेत्री मिळाली... मुक्ताला जरी अवार्ड मिळाला नसेल तरीही तिचे सर्वांग सुन्दर अभिनायासाठी मनापासून अभिनन्दन...
मराठी चित्रपट सृष्टि गेल्या काही महिन्यात अगदी बदललेली वाटते... मराठी चित्रपटात बरेचसे बदल झाले आहेत हे मान्य करावेच लागेल. आजपर्यतच्या मराठी सिनेमात जे नव्हतं किंबहुना ज्याकडे कमी लक्ष्य दिलं जायचं ते आली हे जोगवा, गैर, नटरंग यासारखे सिनेमे बघून पटतं...
तेलगू चित्रपटसृष्टिमध्ये हे तंत्र पाच ते सहा वर्षापासून सर्रास वापरले जातेय...
२०१० च्या राष्ट्रीय पुरस्कारात अतुल कुलकर्णीचे नाव नक्की असेल, यात काय शंका नाही... तांत्रिकदृष्टया सरस मराठी चित्रपटांच्या स्वागताला तैयार राहू या...

Friday, January 22, 2010

माझ्या ब्लॉग वर सर्वांचे स्वागत आहे.............

नमस्कार मित्रानो
माझ्या ब्लॉग वर सर्वांचे स्वागत आहे.............
माझे सिनेमा वेड सगळ्या मित्रांना माहिती आहेच. सिनेमे पाहणे हा एक आवडता छंद.... मराठीमधून लिहावं असं फार वाटत होतं म्हणून हा प्रपंच.........
मित्रानो एन्जॉय करा.
आपला सखा, मित्रा, फ्रेंड
राहुल जगन्नाथ महामुनी